Indurikar Maharaj Net Worth: पाच हजारांसाठी गौतमीवर निशाणा साधणारे इंदुरीकर महाराज किती कमवतात?

सध्या गौतमी पाटीलच्या कार्यंक्रमाला घेतल्या जाणाऱ्या पैशाविषयी इंदुरीकर महाराज यांनी केलेली टिका गाजत आहे.
Indurikar Maharaj Net Worth
Indurikar Maharaj Net Worthesakal

Indurikar Maharaj Net Worth : आपल्या कीर्तनाबरोबर वादग्रस्त वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध असणारे ह.भ.प. इंदुरीकर महाराजांनी सध्या नृत्यांगना गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे. तिच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक किर्तनासाठी नुसते ५ हजार रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

पण स्वतः इदुरीकर महाराज कार्यक्रमाचे किती पैसे घेतात आणि किती कमवतात हे तुम्हाला माहिती आहे का?

इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा बोलबाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे. अख्खा महाराष्ट्र इंदुरीकरांना यू ट्यूबवर ऐकतो. त्यांचा फॅन वर्ग तरुण-तरुणींपासून ज्येष्ठांपर्यंत आहे. त्यांची प्रसिद्धी गावागावात पोहचली आहे. त्यांच्या कीर्तनाची बरीच चर्चाही होते. त्यातील शेरेबाजी आवडत नसल्याचं काहींच म्हणणं आहे. पण त्यांच्या कीर्तनाला वास्तवाची किनार असल्याचंही दिसून येतं.

Indurikar Maharaj Net Worth
Aditya Thackeray Net Worth : बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती

कीर्तनातून उत्तर

महाराज किर्तनासाठी खूप पैसे घेतात, अशी ओरड सुरू झाल्यावर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आपल्या कीर्तनातून दिलं होतं. ते म्हणाले होते की, मलासुद्धा संसार आहे. बायको, मुलं आहेत. तरीही मी कधीही कीर्तनासाठी ठरवून पैसे घेत नाही. कोणीतरी सांगावं की, कीर्तनासाठी महाराजांनी एवढ्या पैशातच होईल असं सांगितलं.

Indurikar Maharaj Net Worth
Rahul Gandhi Net Worth : राहुल गांधींकडे आहे कोट्यावधींची संपत्ती, लाइफस्टाईल अन्...

इंदुरीकर महाराजांच्या या गोष्टी माहितीयेत का?

  • महाराज यांनी बीएस्सी बीएड केलं आहे. त्यांच्या वेळी एवढं शिक्षण म्हणजे ते उच्च शिक्षित आहेत असे म्हणावे लागेल.

  • महाराजांच्या पत्नी शालिनी देशमुख या स्वतः कीर्तनकार आहेत. त्या महाराजांएवढ्या प्रसिद्ध नसल्या तरी त्यांचेही कीर्तन लोक आवडीने ऐकतात.

  • महाराजांच्या लग्नाला साधारण २० वर्ष झाल्याचे जवळचे लोक सांगतात. तर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

  • महाराजांचं मुळ गाव अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील इंदोरी. पण महाराज सध्या संगमनेर तालुक्यातील ओझर गावात स्थायिक आहेत.

Indurikar Maharaj Net Worth
Emran Hashmi Net Worth : 'सीरियल किसर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाशमीची संपत्ती 105 कोटी...

दोन वर्षांच्या तारखा असतात बुक

महाराजांची प्रसिद्धी भरपूर असल्याने त्यांची मागणीही मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे महाराजांच्या तारखा सर्व अॅडव्हांस्ड बुक असतात. त्यांचे रोजचे तीन व्याख्यानं असतात.

१३वी स्कॉर्पिओ

महाराजांनी त्यांच्या एका कीर्तनात म्हटले आहे की, साधारण २०१८च्या सुमारास त्यांंनी १३ वी स्कॉर्पिओ घेतली. ते म्हणाले की, कीर्तनासाठी मी एवढा फिरतो की, मी आता १३ वी स्कॉर्पिओ गाडी घेतली आहे. मला फक्त ११ महिने गाडी टिकते. अकराव्या महिन्यात गाडी वाजायला लागते. आता तर ३ महिन्यातच वाजायला लागते.

किती घेतात एका कीर्तनासाठी पैसे?

उपलब्ध माहितीनुसार महाराज एका कीर्तनासाठी साधारण ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत चार्ज करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com