

Indurikar Maharaj news
esakal
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी प्रचंड खर्च केल्याने त्यांना राज्यभरातून तीव्र टीका सहन करावी लागली. किर्तनांमध्ये लग्न साधेपणाने करा, असा उपदेश ते स्वतः देतात; पण मुलीच्या साखरपुड्यात मात्र लाखो रुपयांचा खर्च झाल्याने लोक संतापले. नुकताच त्यांच्या मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साहिल चिलाप यांच्याशी साखरपुडा पार पडला. टीकेच्या लाटेनंतर महाराजांनी मौन सोडत, त्याच कार्यक्रमात आपली भूमिका स्पष्ट केली.