
Uday Samant Marathi News : उद्योजकांना खंडणीसाठी जर कोणा माफियानं किंवा गुंडानं धमकी दिल्यास त्यांनी पुढे येऊन त्यावर बोलावं, सरकार त्यांना संरक्षण देईल अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील उद्योग आणि मराठी भाषा यासंर्भात आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.