आमदार सुभाष देशमुखांना उद्योगमंत्र्यांची ग्वाही, पण ‘MIDC’कडून पूर्तता नाही! नवीन अग्निशामक केंद्र कागदावरच

अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारावे, अशी मागणी मागील अधिवेशनात आमदार सुभाष देशमुखांनी केली होती. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ हा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती.
MLA Subhash-Deshmukh
MLA Subhash-Deshmukhsakal solapur

सोलापूर : अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारावे, अशी मागणी मागील अधिवेशनात आमदार सुभाष देशमुखांनी केली होती. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ हा विषय मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. परंतु, त्यासंबंधीचा प्रस्ताव दीड महिन्यांपूर्वी 'एमआयडीसी'ला सदर करूनही त्यासंबंधीची कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

एप्रिल २०२२ ते १८ जुलै २०२३ या काळात सोलापूर शहरात आगीच्या तब्बल ४२१ घटना घडल्या आहेत. त्यात एकूण १३ जणांना जीव गमवावा लागला आहे. अंदाजे सहा ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या 'एमआयडीसी'त आग लागल्यानंतर रविवार पेठेतील अग्निशामक केंद्रावरून बंब त्याठिकाणी न्यावा लागतो. त्यासाठी जवळपास आठ मिनिटे लागतात.

पण, एमआयडीसीत स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारल्यास अवघ्या दोन मिनिटात मदत करणे शक्य होणार आहे. त्यासाठी आमदार देशमुखांनी उद्योजकांच्या वतीने ही मागणी सरकारकडे केली होती. त्यांचेच सरकार असतानाही उद्योगमंत्र्यांनी दिलेली ग्वाही अजूनही पूर्ण होऊ शकलेली नाही, हे विशेष. १ एप्रिल ते १८ जुलै २०२३ या काळात अक्कलकोट रोड 'एमआयडीसी'त पाच आगीच्या घटना झाल्या असून एका घटनेत तीन कामगारांचा जीव गेला आहे.

दीड महिन्यापूर्वी दिला प्रस्ताव, तरीही...

अक्कलकोट रोड ‘एमआयडीसी’सह त्या परिसरात गारमेंट, टेक्स्टाईल असे अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र अग्निशामक केंद्र होऊ शकले नाही हे दुर्दैवच. अनेकदा उद्योजकांनी लोकप्रतिनिधींना निवेदने दिली, पण त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. मार्च २०२३ मधील अधिवेशनात आमदार सुभाष देशमुख यांनी आवर्जून हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मिळालेले आश्वासन कधी पूर्ण होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, महापालिकेने दीड महिन्यांपूर्वीच जागा निश्चित करून ‘एमआयडीसी’ला प्रस्ताव सादर केल्याची माहिती अग्निशामक विभागाचे प्रमुख केदार आवटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

पत्राशेडमध्ये ‘अग्निशामक’ची गाडी

एमआयडीसीतील आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याठिकाणी अग्निशामक केंद्र प्रस्तावित आहे. पण, त्याची कार्यवाही अजूनही होऊ शकलेली नाही. तोवर अग्निशामक विभागाने पत्राशेड मारून तेथे एक गाडी (बंब) ठेवला आहे. जेणेकरून आगीची घटना घडल्यावर काही वेळात त्याठिकाणी मदत पोचवणे शक्य होईल हा हेतू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com