धक्कादायक! ZP शाळेच्या शौचालयातच फेकलं जिवंत अर्भक; गोंदियातील घटनेनं खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Infant Was Found in Toilet ZP School Gondia

शाळेला चारही बाजूने भिंतीचे मोठे कंपाऊंड असून गेट बंद असतानाही इथं अर्भक टाकण्यात आलं आहे.

धक्कादायक! ZP शाळेच्या शौचालयातच फेकलं जिवंत अर्भक; गोंदियातील घटनेनं खळबळ

गोंदिया : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून (Zilla Parishad School) एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सडक अर्जुनी तालुक्यातील राका या गावात हा प्रकार घडलाय. राका गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्यानं मोठी खळबळ उडालीय.

शाळेतील शौचालयात रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीनं अर्भक टाकून पसार झाल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, याबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यामधील (Sadak Arjuni Taluka) राका या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार घडलाय. सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावामधील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्यानं खळबळ उडालीय.

हेही वाचा: 'सुषमा अंधारेंच्या नादाला लागू नका, अन्यथा कुंभारावानी चिखलासारखं तुडवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही'

हा प्रकार कोणी केला आणि का केला, याबाबत अद्याप कोणताही पुरावा हाती लागला नसल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या शाळेला चारही बाजूने भिंतीचे मोठे कंपाऊंड असून गेट बंद असतानाही इथं अर्भक टाकण्यात आलं आहे. दरम्यान, प्राथमिक शाळा परिसरातच प्रसूती झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा अधिक तपास आता पोलिस करत आहेत.

हेही वाचा: मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राचा माजी मंत्री जखमी; डोळा, डोक्याला दुखापत