INS Vikrant : माजी सैनिकांची सोमय्यांविरोधात पोलिसात तक्रार!

Ex-servicemen lodge complaint with police against Somaiya
Ex-servicemen lodge complaint with police against SomaiyaEx-servicemen lodge complaint with police against Somaiya

भाजपचे किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून लोकांकडून सुमारे ५० कोटी रुपये गोळा केले होते. परंतु, ते पैसे त्यांनी राज्याच्या तिजोरीत जमा केले नाहीत, असे ते म्हणाले होते. याप्रकरणी आता निवृत्त आर्मी अधिकारी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे. (Ex-servicemen lodge complaint with police against Somaiya)

पाकिस्तानविरुद्धच्या १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यात आयएनएस विक्रांतचाही समावेश होता. आयएनएस विक्रांतची स्थिती बिघडली आणि तिची देखभाल करणे कठीण झाले, तेव्हा त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्याच्या मोहिमा सुरू झाल्या. यासाठी सुमारे दोनशे कोटींची गरज होती. किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी आयएनएस विक्रांतसाठी निधी उभारण्यासाठी मोहीम सुरू केली होती, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता.

Ex-servicemen lodge complaint with police against Somaiya
टिळा लावला म्हणून अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण; शाळेतील प्रकार

सोमय्या यांनी स्वयंसेवकांच्या मदतीने लोकांना टी-शर्ट आणि जर्सी घालून मुंबई विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर जाऊन ‘सेव्ह विक्रांत’साठी पैसे गोळा करण्याचे आवाहन केले. त्यावेळी अनेकांनी आयएनएस विक्रांतसाठी देणगी दिली. काल मला तीन-चार जणांनी फोन करून नेव्ही नगर, चर्च गेट आणि चेंबूरमध्ये ५,००० आणि दहा हजार दान केल्याचे सांगितले, असेही संजय राऊत म्हणाले.

यावेळी किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून लोकांकडून सुमारे ५० कोटी रुपये गोळा केले होते. बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँड किंवा राफेल घोटाळ्यांपेक्षा ही रक्कम कमी असू शकते. परंतु, ती देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. महाराष्ट्र सरकार या प्रकरणाची चौकशी करेल. परंतु, ही केंद्र सरकारचीही जबाबदारी आहे. मी आयकर आणि सीबीआयला चौकशी करण्याचे आवाहन करतो. हा सरळसरळ देशद्रोहाचा खटला आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. आता या प्रकरणी किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध निवृत्त आर्मी अधिकारी गुन्हा दाखल करण्याची शक्यता (complaint) आहे. हा गुन्हा चेंबूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com