esakal | मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास दरात वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

cab

मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास दरात वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (International Airport) मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास (Taxi traveling) शुक्रवार पासून महागणार असून, खटूवा समितीच्या शिफारशीनुसार मुंबई-पुणे टॅक्सीची भाडेवाढ (Taxi rent) करण्यात आली आहे. विना वातानुकूलित आणि वातानुकूलित टॅक्सी भाड्यात आता 100 रुपयांची वाढ करण्यात आली असून, वातानुकूलित टॅक्सीसाठी (AC taxi) आता 425 ऐवजी 525 तर विनावातानुकूलित टॅक्सीसाठी 350 ऐवजी 450 रुपये प्रवाशांना मुंबई-पुणे प्रवासासाठी द्यावे लागणार आहे.

हेही वाचा: महाविकास आघाडीत बिघाडी? मंत्र्यांच्या विरोधात आमदाराची याचिका

पेट्रोल, डिझेल, वाहनाचा विमा दरात सातत्याने वाढ झाली आहेत. ग्राहक मुल्य निर्देशांकामध्ये सुध्दा वाढ झाली असून, मुंबई - पुणे टॅक्सी संवर्गात वापरात येणाऱ्या वाहनांची सरासरी किंमत, विम्याचा हफ्ता, मोटार वाहन कर, व्यवसाय कर, इंधन, दुरुस्ती व देखभाल, राहणीमान खर्च व ग्राहक निर्देशांकात वाढ झाली आहे. त्यासोबतच गेल्या सात वर्षापासून भाडेवाढ देण्यात आली नसल्यामुळे मुंबई पुणे टॅक्सी भाडेदरात सुधारणा करण्याची विनंती मुंबई पुणे टॅक्सी ओनर्स असोसिएशन यांनी केली होती.

खटूवा समितीच्या शिफारशीनुसार काळी-पिवळी टॅक्सीची भाडेवाढ करून प्रति किलोमीटर दर 16.93 रुपये करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मुंबई-पुणे 155 किलोमीटर अंतराकरीता परीगणना केली असता प्रति प्रवासी भाडे 656 रुपये तर कुल कॅब टॅक्सी भाडे दरात वाढ करून प्रति किलोमीटर 22.26 करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मुंबई पुणे 155 किलोमीटर अंतराकरिता परीगणना केल्यानंतर प्रति प्रवासी भाडे 863 रुपये इतके येणार आहे.

काळी पिवळी टॅक्सी, कुल कॅबचे नवे दर

वाहन (प्रति किलोमीटर ) - वाढ - टक्केवारी

काळी पिवळी मीटर टॅक्सी - 2.94 रुपये - 21.27 टक्के

कुल कॅब - 4.81 रुपये - 17.56 टक्के

loading image
go to top