International Driving License : ठाणेकरांना मिळाला फॉरेनमध्ये वाहन चालविण्याचा परवाना; असे मिळते लायसन्स

परदेशातही वाहन चालविण्याचा मार्ग मोकळा !
international driving license
international driving license sakal

ठाणे : नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या भारतीयांना विविध देशांत वाहन चालविण्यासाठी त्या देशाचा वाहन चालवण्याचा परवाना घ्यावा लागतो, मात्र तेथील किचकट कागदपत्रांच्या प्रक्रियेमुळे वाहन चालविण्याचा परवाना मिळणे कठीण होते.

अशात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून परदेशातही वाहन चालविण्याचा परवाना देण्यात आला. मार्च २०२३ अखेरीस अशा प्रकारे एक हजार ७८५ ठाणेकरांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाने दिले; तर यंदाच्या वर्षात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत तब्बल ६०० आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचे परवाने देण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.

international driving license
Thane : मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार ठाणे जिल्ह्याचा दौरा, पक्ष संघटनाचा घेणार आढावा

असा मिळतो परवाना

जे भारतीय किंवा ठाणेकर परदेशात नोकरी, व्यापारासंबंधी जातात अशांना ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तत्पूर्वी त्यांच्याकडे भारतीय वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्जानंतर दस्तावेजाची पडताळणी करण्यात येते. हा मिळविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, व्हिसा, दोन फोटो मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

सर्व ऑनलाईन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडावीत त्यानंतर कार्यालयात मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे लागते. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रक्रियेनंतर परवाना मिळतो.

international driving license
Mumbai Local : नशेच्या धुंदीत सीएसएमटी स्थानकात लोकलवर प्रवासी चढला! हार्बर विस्कळीत

परवान्याची मुदत एक वर्षाची

परदेशात बहुतांश भारतीय हे शिक्षण, नोकरी किंवा व्यापारासाठी जातात. यासाठी त्यांना एका निश्चित काळासाठी व्हिसा दिला जातो. प्रत्येक वर्षी व्हिसा नूतनीकरण करावा लागतो. त्यामुळे परिवहन कार्यालयातून देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना याचा कालावधी हा एक वर्षाचा असतो.

१,७८५ ठाणेकरांना आंतराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना

1. कोरोना महामारीचे संकट टळले आणि देशातील आणि परदेशातील व्यवहार सुरळीत सुरू झाले. महामारीत भारतात आलेल्यांना परदेशात नोकरीची संधी पुन्हा मिळाली. त्यामुळे भारतातील अनेकजण परदेशात जाण्यास उत्सुक आहेत.

2. उच्चशिक्षित अनेक तरुण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियासारख्या देशात मोठ्या पगाराची नोकरीची संधी मिळत असल्याने परदेशात जात आहेत. अशा भारतीयांना परदेशात दस्तावेजाअभावी वाहन चालविण्याचा परवाना मिळवता येत नाही, मात्र वाहन चालवण्याचा परवाना मिळाल्यास स्वतः वाहन चालवून अनेक कामे मार्गी लागतात.

3. त्यामुळे परदेशात सातत्याने कामानिमित्त जाणाऱ्या आणि नोकरीसाठी गेलेल्या ठाणेकरांना ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मार्च २०२३ अखेरपर्यंत पाऊणेदोन हजार आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचे परवाने दिले आहेत.

international driving license
Driving Tips : छोटया गोष्टींचे मोठे परिणाम; एक चूक अन् गमवाल प्राण

देण्यात आलेले परवाने

  • १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ - १,७८५

  • १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ - ८६३

  • १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२३ - ६००

परदेशात वाहन चालविण्यासाठी एक वर्षाचा आंतरराष्ट्रीय परवाना देण्यात येतो. त्यासाठी परदेशी जाणाऱ्या व्यक्तीला भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, व्हिसा, दोन फोटो मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र महत्त्वाचे असून, सर्व ऑनलाईन फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडून समक्ष हजर राहावे लागते. सर्व पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय वाहन परवाना एक वर्षाचा दिला जातो.

- जयंत पाटील, (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com