खोट बोलणार नाही... मुंबई तुंबणार,अन् रस्त्यावर खड्डेही पडणार; आदित्य ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

interview of aditya thackeray on rainy season flash flooding mumbai
खोट बोलणार नाही...मुंबई तुंबणार,अन् रस्त्यावर खड्डेही पडणार; आदित्य ठाकरे

मुंबई तुंबणार,अन् रस्त्यावर खड्डेही पडणार : आदित्य ठाकरे

मुंबईत दहिसर, ओशिवरा आणि पोयसर या नद्यांच्या ठिकाणी काम सुरू आहे. याठिकाणी धोक्याच्या पातळीपेक्षा पाणी जास्त गेल्यास काय उपाययोजना करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू आहे. मुंबई २ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी कॉंक्रिटचे रस्ते तयार करण्याचे प्रकल्प सुरू आहेत. जागतिक पातळीवर ज्या देशात १२ महिने पाऊस पडतो अशा ठिकाणी कॉंक्रिटचे रस्ते कोणच्या पद्धतीने तयार करतात याचा आढावा आम्ही घेत आहोत.

पण गेल्या ८ ते १० वर्षात नवे रस्ते झाले आहेत तिथे खड्डे पडणार नाहीत. पण ज्याठिकाणी जुने रस्ते आहेत, तसेच अंतर्गत विविध इतर यंत्रणांच्या रस्त्याच्या ठिकाणी मात्र खड्डे पडू शकतात. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणारच नाहीत असा दावा करणार नाही असेही पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. मॉन्सूनपूर्व बैठकीचा आढावा घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुंबईतील दरडींवर सुरू असलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. खोट बोलणार नाही, मुंबईत अतिवृष्टी झाल्यास गुडघाभर पाणी साचणारच असाही खुलासा त्यांनी यावेळी केला.

मुंबईत गुडघाभर पाणी तुंबणारच

ज्या पद्धतीने आपण ऊन्हाळा पाहिला आहे, जिथे ४५ डिग्री सेल्सिअस तापमान पोहचले आहे, त्यानुसारच मॉन्सूमध्येही अतिवृष्टी झाल्यास पूरस्थिती येण्याची अपेक्षा आहे. अतिवृष्टीसारख्या संकटामुळे मुंबईत अनेक ठिकाणी गुडघ्या इतके पाणी भरेलच असाही अंदाज आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. फ्लॅश फ्लडिंग होऊन मुंबईतही पाणी साचू शकते असेही ते म्हणाले. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी ४८० पंप लावत आहोत. नवीन ठिकाणी पाणी साचणाऱ्या ठिकाणी ऑनग्राऊंड जाऊन काम करण्याचेही आम्ही सुचवले आहे.

दरडींसाठी उपाययोजना काय ?

मुंबईत अनेक ठिकाणी दरडींचा धोका हा यंदाच्या वर्षीही आहे. गेल्या वर्षी तीन ठिकाणी अनेक ठिकाणी संरक्षक भींती असूनही मुंबईत दरडी कोसळून अपघात झाले होते. काही ठिकाणी झोपडपट्टी वाढल्याने रहिवासी वस्तीत पोहचणे ही अतिशय आव्हानाची स्थिती असते. म्हाडा, एसआरए यांच्यासोबत बोलून अशा व्यक्तींना कशा पद्धतीने स्थलांतरीत करता येईल, याबाबतची चर्चा सुरू आहे. स्थलांतरी करण्याचा दोन तीन वर्षांचा कार्यक्रमक आहे. डीपीसी असो वा नगर विकास विभाग असो यांच्या माध्यमातून आम्ही निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. यंदाही ६२ कोटींचा फंड पक्ष न पाहता वितरीत केला आहे.

ज्याठिकाणी आपत्कालीन परिस्थितीचा धोका जास्त आहे अशा ठिकाणी प्राधान्य देण्यात येत आहे. रिस्क असेसमेंटच्या ठिकाणी आम्ही निधीसाठी ठिकाणांची निवड केली असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून आता काम सुरू झाले आहे. डीपीसीत उरलेली कामे असतील त्याठिकाणी कामे करून घेण्यात येईल. पण पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याच्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहोत. त्यामुळे दरडीच्या ठिकाणी नागरिकांना स्थलांतर हे करावेच लागणार आहे. मध्यंतरीच्या काळात पीएपीसाठी ३० हजार घरे आपण तयार करणार आहोत. ही घरे तयार झाल्यावर दरडीच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आपण स्थलांतरीत करणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. पाण्याच्या निचरा करण्यासाठीच्या उपाययोजना सुरू आहेत.

रिस्पॉन्स टाईम

यंदाचा अनुभव पाहिला तर हिवाळा आणि उन्हाळा अपेक्षेपेक्षा जास्त तीव्र राहिला आहे. त्यामुळेच पावसाळाही अशाच पद्धतीने असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मॉन्सूनचा कालावधी यंदाही जोरदार आणि आव्हानाचा असू शकतो. म्हणूनच या कालावधीत आपला प्रतिसाद काय असायला हवा यासाठी आमची तयारी सुरू आहे. या काळात हानी कमी होईल यासाठी आमचा प्रयत्न असेल. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेसोबतच आम्ही एनडीआरएफ, एसडीआरएफची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टी झाल्यास किंवा ढगफुटी झाल्यास मुंबईसारखी यंत्रणा कुठेही नसल्याचा दावा त्यांनी केला.

पाऊस आला तर रिस्पॉन्स टाईम कमी असावा यासाठी आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन ते चार महिन्यात मॉन्सूनपूर्व कामे ही मुंबईत होत असतात. या निमित्ताने कामांचा आढावा हा मुंबईत सर्व यंत्रणांसोबत आदित्य ठाकरे यांनी घेतला. मुंबईत सुरू असणाऱ्या ९० टक्के पाणी भरणारी ठिकाणे आपण नियंत्रणात आणली आहेत. तर खड्डे भरण्यासाठीची कामे, नाले सफाई आणि वृक्ष छाटणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पॉटहोल मॅनेजमेंट सिस्टिम, रस्त्याची होणारी कामे वेळेत करणे, स्टॉम वॉटर ड्रेन, बॉक्स ड्रेनची कामे वेळेत करणे यासाठीचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी अशी आहे की आपल्याला हिंदमाताला जावे लागणार नाही याबाबतही आज चर्चा करण्यात आली.