
IPS Ashok Kamte
esakal
राजकारणी आणि पोलीस यांच्यातील संघर्ष आपण अनेकदा पाहतो, कधी झटापट, कधी दबाव, तर कधी आरोप-प्रत्यारोप. मात्र, काही अधिकारी असे होते की ज्यांच्यासमोर लोकप्रतिनिधीही दडपून जात. सोलापूरातील एका आयपीएस अधिकाऱ्याने तर आमदाराला थेट फरफटत पोलीस स्टेशनमध्ये नेले होते! हा प्रसंग ऐकताना तुम्हाला तो एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा वाटेल; पण हे वास्तव आहे. शूर पोलीस अधिकारी अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी ‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकात ही आठवण उलगडली आहे.