Iran–Israel war: इराणवरील हल्ल्यात एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू; सरकारने दिली सर्व माहिती
Devastating Toll in Iran: Over a Thousand Confirmed Dead from Israeli Airstrikes as Conflict Escalates
अमेरिकेतील एका स्वयंसेवी संस्थेने मात्र मृतांची संख्या १,१९० इतकी सांगितली असून साडे चार हजार जण जखमी झाल्याचा दावा केला आहे.
तेहरान: इस्राईलने इराणमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये एक हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे इराण सरकारने आज जाहीर केले. हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.