
किरीट सोमय्या ED चे प्रवक्ते आहेत का? नवाब मलिकांचा सवाल
नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नुकतंच आपल्या घरी सरकारी पाहुणे अर्थात तपास यंत्रणा येणार असल्याचं म्हणत आपण त्यांचं स्वागत करतो असं ट्विट केलं होतं. त्यातच आता नवाब मलिक यांनी आज ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमैया (Kirit Somaiya) म्हणता आहेत की, पुण्यातील वक्फ बोर्डाच्या जागेच्या प्रकरणावरून ईडी मलिकांच्या घरी जाईल, मात्र आपण स्वत: ईडी कार्यालयात जाऊ असा टोला त्यांनी लगावला. तसेच किरीट सोमैया यांना तुम्ही प्रवक्त बनवलं असेस, तर अधिकृतरित्या त्यांना प्रवक्त बनवा असं आवाहन त्यांनी ईडीला केलं आहे.
हेही वाचा: "पवारांना मी खुर्ची का दिली? जाणून घ्यायचंय..."; राऊतांचा भाजपला सल्ला
नवाब मलिक म्हणाले की, पुण्यात वक्फ बोर्डाच्या जमिणीवर छापरेमारी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या तेव्हाच आपण सांगितलं होतं की वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर छापे पडलेले नाही. माध्यमांमध्ये बातम्या पेरल्या जाता आहेत. ईडीला जर कारवाई करायची असेल, तर रीतसर प्रेस रिलीज काढा. महाराष्ट्रातील सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका असा इशाराच त्यांना ईडीला दिला. आम्ही सर्व कागपत्र द्यालया तयार आहोत. ईडीच्या लोकांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला बोलावलं आणि म्हणाले की, तुम्ही एफआयआर केला. ७ कोटी लुटणाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न ईडी करत आहे का? असा प्रश्न देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
हेही वाचा: MIMच्या रॅलीला परवानगी नाही; Omicron मुळं मुंबईत जमावबंदी
दरम्यान, वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या घोटाळ्यात लवकरच एका भाजप नेत्याविरोधात एफआयआर दाखल करून, त्यांना अटक केली जाईल. ईडीने त्याला बोलवावं आणि त्याची चौकशी करावी.
Web Title: Is Kirit Somaiya The Spokesperson Of Ed Nawab Maliks Question To Ed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..