esakal | आता प्रत्येक हॉस्पिटलला अॉक्सीजन प्लँट बंधनकारक - जावडेकर
sakal

बोलून बातमी शोधा

prakash javadekar

आता प्रत्येक हॉस्पिटलला अॉक्सीजन प्लँट बंधनकारक - जावडेकर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदनगर ः प्रत्‍येक रुग्‍णालय ऑक्सिजनच्‍या सुविधेने स्‍वयंपूर्ण करण्‍याचा केंद्र सरकारचा मानस आहे. रुग्‍णालयातील बेडच्‍या संख्‍येनुसार ऑक्सिजन प्रकल्‍पाची सक्‍ती करण्‍याचा नियम सरकार लवकरच केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Minister of Environment) यांनी केला.

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोरोनाच्या काळात जिल्हा अॉक्सीजननिर्मितीत स्वयंपूर्ण झाला पाहिजे, यासाठी संकल्प केला होता. महिनाभरातच अॉक्सीजननिर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून प्रतिमिनिट ५०० लिटर अॉक्सीजन निर्मिती होणार आहे. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनमध्‍ये कार्यान्वित झालेल्‍या स्‍वयंपूर्ण अशा देशातील पहिल्‍या ऑक्सीजन प्रकल्‍पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (prakash javadekar) यांच्‍या हस्‍ते व्‍हर्चुअल पद्धतीने करण्यात आले. (It will be mandatory for every hospital in India to set up an oxygen plant)

यावेळी प्रबोधनकार निवृत्‍ती महाराज इंदोरीकर, आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील, डॉ. विखे पाटील फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विश्वस्त डॉ. सुप्रियाताई ढोकणे-विखे पाटील, ॲड. वसंतराव कापरे, सुभाष भदगले, लेफ्टनंट जनरल डॉ. बी. सदानंदा (रिटायर्ड), उपसंचालक डॉ. अभिजीत दिवटे, तांत्रिक संचालक डॉ. पांडुरंग गायकवाड यांच्‍यासह फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अॉक्सिजनच्या समस्येमुळेच दुसरी लाट घातक ठरली. संकटाच्‍या काळातही एक हजार टन ऑक्सिजनची उपलब्‍धता केली. यासाठी देशातील स्टिल उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्‍यांनीही मोठी मदत केली. पीएम केअर फंडातूनही आता ऑक्सिजन प्रकल्‍प उभा करण्‍याचा निर्णय घेतला आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

डॉ.विखे पाटील फौंडेशनने हा प्रकल्‍प ही एक चांगली सुरुवात आहे. भविष्‍यात हॉस्पिटलमध्‍ये असलेल्‍या बेडच्‍या संख्‍येच्‍या प्रमाणात ऑक्सिजन प्रकल्‍प उभारण्‍याचा नियम सरकार करणार आहे. देशात टंचाई निर्माण झाल्‍यानंतर परदेशातून ऑक्सिजन मागवावा लागला. कंटेनरची संख्‍याही कमी आहे. परंतु कुठेही कमी न पडता साधनांची उपलब्‍धता करून दिली. विखे पाटील परिवाराने सेवेचे काम समजून हा प्रकल्‍प उभारण्‍याचा केलेल्‍या निर्णयाचे त्‍यांनी कौतूक केले.

इंदोरीकर महाराज म्‍हणाले की, काळाची गरज ओळखून विखे पाटील परिवार समाजासाठी काम करत असतो. कोव्‍हिडच्‍या सं‍कटात या परिवाराने जिल्‍ह्यासाठी खूप काही केले.

आ.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले, पद्मश्री डॉ. विखे पाटील आणि आदरणीय खासदार साहेबांनी लावलेल्‍या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर होत आहे. फौंडेशन आणि जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून मोठी मदत करता आली. हा ऑस्किजनचा प्रकल्‍प हा सेवेचाच एक भाग आहे. खा.डॉ.सुजय विखे पाटील (Mp sujay vikhe patil) यांनी उपस्थितांचे आभार मानले. (It will be mandatory for every hospital in India to set up an oxygen plant)