
पहिल्या टप्प्यात या येरवडा, तर दुसऱ्या टप्प्यात नागपुरातील कारागृहात 'जेल पर्यटन' सुरू करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
नागपूर : पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये 'जेल पर्यटन' सुरू करण्यात येणार आहे. येत्या २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख आहे. आज नागपुरातील जिमखान परिसरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...
पुण्यात ५०० एकरात येरवडा कारागृह आहे. त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. अजमल कसाबला देखील याच कारागृहात फाशी देण्यात आली होती. या कारागृहातील माहिती बाहेरच्या जनतेला व्हावी. त्यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसाधारण जनतेला या कारागृहात पर्यटन करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात येरवडा, तर दुसऱ्या टप्प्यात नागपुरातील कारागृहात 'जेल पर्यटन' सुरू करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, नागपुरातील एका कर्मचाऱ्याकडे ड्रग्स सापडले असून तो कैद्यांना पुरवत होता. त्याची कसून चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले होते. त्याबाबत विचारले असता, कोणत्याही कारागृहात असे होत असल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं
बालाकोटचा हल्ला झाला. त्यावेळचे व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. त्याची माहिती ३ दिवसांपूर्वीच अर्णब गोस्वामींना कशी माहिती? या सर्व गोष्टी नॅशनल सिक्युरिटीसोबत जुळलेल्या आहेत. ते एका पत्रकाराला कसे माहिती होऊ शकते? याबाबत केंद्र शासनाने उत्तर द्यावे, असेही गृहमंत्री म्हणाले.