दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं

अनिल कांबळे
Friday, 22 January 2021

कृष्णकुमार याचे एका १९ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांच्याही प्रेमाची कुणकुण कृष्णाच्या घरी लागली. त्यामुळे त्याने तरुणीला थेट घरी आणून आईवडीलांची भेट घालून दिली.

नागपूर : दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रियकराला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे प्रेयसीने लग्नास नकार केला. त्यामुळे तो नैराश्‍यात गेला. तणावात असलेल्या प्रियकराने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कृष्णकुमार रहांगडाले (२३, कळमना) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

कळमना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार याचे एका १९ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांच्याही प्रेमाची कुणकुण कृष्णाच्या घरी लागली. त्यामुळे त्याने तरुणीला थेट घरी आणून आईवडीलांची भेट घालून दिली. तसेच तरुणीशी लग्न लावून देण्याची विनंती केली. त्याच्या कुटुंबीयांनीही तरुणीच्या आईवडीलांची भेट घेतली. लग्नाबाबत बोलणी करीत दोघांचे लग्न पक्के केले. दोघांनीही सुखी संसाराचे स्वप्न पाहणे सुरू केले. दोघांच्याही भेटी-गाठी होत राहिल्या. लग्नाची तारीख ठरवायची होती. काही महिन्यातच लग्नाची तारीख काढून बार उडवू असे ठरले. यादरम्यान कृष्णाला दारूचे व्यसन लागले. बेरोजगार असलेला कृष्णा बिघडायला लागल्यामुळे त्याच्या वडिलाने त्याला लगेच मोबाईल शॉपी टाकून दिली.

हेही वाचा - अन् पराभूत उमेदवार झाला विजयी; ३ दिवसांच्या आंनदोत्सवावर विरजण; नक्की काय घडला प्रकार 

काही दिवस व्यवस्थित चालविल्यानंतर तो पुन्हा दारू प्यायला लागला. मात्र, कृष्णाच्या व्यसनाधिनतेमुळे दुकान चालू शकले नाही आणि पैसे बुडाले. कृष्णा दारूच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत होता. तो दररोज दारू पिऊन प्रेयसीशी वाद घालत होता. रोजच्या कटकटीला कंटाळून तरुणीने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे कृष्णा तणावात गेला. यातूनच मंगळवारी दुपारी त्याने छताच्या हुकला ओढणी बांधून गळफास लावला. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कुटुंबीयांनी त्याला गळफास लावलेल्या अवस्थेत पाहून पोलिसांना सूचना दिली. पोलिस उपनिरीक्षक खोब्रागडे पथकासह घटनास्थळावर पोहोचले. पंचनामाकरून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth committed to suicide in nagpur