'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सशक्त अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त दुसरा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार "जैत रे जैत' या चित्रपटाला जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना सन्मानित केले जाणार आहे.

विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शनिवारी (ता. 15) रात्री 8.30 वाजता होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात "जैत रे जैत' चित्रपटाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, निर्मात्या उषा मंगेशकर आणि अभिनेते मोहन आगाशे यांना स्मिता पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या सोहळ्यात स्मिता पाटील यांच्या संवेदनशील अभिनयाने चिरस्मरणीय झालेल्या "जैत रे जैत' आणि "उंबरठा' या चित्रपटांविषयी परिसंवाद रंगणार आहे.

Web Title: Jait-Re-Jait Movie Smita Award Smruti Award