Jalgaon Cremation Ground Incident
esakal
जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहाच्या जागेजवळ नारळ, लिंबू, अंडे, दारूची बाटली आणि अगरबत्ती आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या वस्तू ठेवून अघोरी पूजा किंवा काही विधी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.