
Politics News : शिवसेना-काँग्रेसने राष्ट्रवादीला धोका दिला! महाविकास आघाडीत बंडखोरी
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बंडखोर संजय पवार हे विजयी झाले आहे. संजय पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होती. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार आमने-सामने होते. महाविकास आघाडीकडून रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे संजय पवार यांनी बंडखोरी केली.
संजय पवार यांना शिंदे गटाने पाठिंबा दिला होता. एका पक्षाचे दोन्ही उमेदवार समोरासमोर असल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. यामध्ये २१ पैकी ११ मत संजय पवार यांना मिळाली तर पराभूत झालेल्या रवींद्र पाटील यांना १० मत मिळाली.
काँग्रसमध्ये फूट पडल्याने पराभव झाल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रवींद्र पाटील विजयी होतील म्हणून चर्चा होती. मात्र काही क्षणात राजकीय घडामोडी घडल्या आणि संजय पवार यांच्या विजयाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मत आहेत. राष्ट्रवादीचे जे १० मत आहेत. यामध्ये १ मत फुटलं, त्यानी गद्दारी केली. मी स्वत: पुढाकार घेऊन ही बँक ताब्यात आणली. या ठिकाणी शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी संजय पवार यांना समर्थन द्यावं. काँग्रेसने आणि शिवसेनेने संजय पवार यांना समर्थन दिलं. महाविकास आघाडीत अशाप्रकारे आम्हाला अपेक्षा नव्हती.