शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

BJP and Shiv Sena Clash Over Jalgaon MLC Seat: जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत तणाव वाढला आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंकडे शिवसेनेने साकडे घातले असून भाजपने उमेदवार जवळपास निश्चित केला आहे.
शिवसेना

शिवसेना

esakal

Updated on: 

जळगाव: विधान परिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या जळगावच्या जागेवरून राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या भाजप व शिवसेना या दोन पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १७ जागांमधील वाटा वाढवून मिळण्यासाठी 'दिल्ली वारी' केली. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी जळगावच्या जागेसाठी मंगळवारी (ता. २६) श्री. शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. आता 'जलजीवन मिशन'च्या बैठकीसाठी पालकमंत्री बुधवारी दिल्लीत जाणार असून, ते कुणाची भेट घेता का, हे पाहावे लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com