Sanjay Raut
Sanjay Rautesakal

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री गुंडांची टोळी चालवतात काय? जळगावमध्ये जावून संजय राऊतांनी ठोकला शड्डू

Published on

जळगावः माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची आज जळगावच्या पाचोऱ्यामध्ये सभा होत आहे. या सभेसाठी संजय राऊत पाचोऱ्यात दाखल झालेले असून त्यांनी गुलाबराव पाटलांसह मुख्यमंत्र्यांवर आसूड ओढला आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जिल्ह्यात ठाकरे गटाची सभा होत आहे. जळगावच्या पाचोऱ्यात ही सभा होत असल्याने संपूर्ण राज्याचं उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष लागून राहिलेलं आहेत. त्याच अनुषंगाने गुलाबराव पाटील यांनी काल एक वादग्रस्त विधान केलं. 'गुलाबराव पाटील दगड मारुन सभा उधळून लावणारा आहे' असं विधान पाटलांनी केलं होतं.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यावर काही वेळापूर्वी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, मुख्यमंत्री कॅबिनेट चालवतात की गुंडाची टोळी? राज्याच्या कॅबिनेटमध्ये गुंड भरलेत का? मंत्र्यांनी गुंडांची भाषा करु नये, त्यांनी सांगावं ते मंत्री आहे की गुंड? असा सणसणीत सवाल संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut
Atiq Ahmed : अतिक अहमदचे मारेकरी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे पोलिसांना मिळाल्या 'या' वस्तू

दरम्यान, काही वेळातच उद्धव ठाकरेंची पाचोऱ्यात सभा संपन्न होणार आहे. या सभेची संपूर्ण तयारी झाली असून ठाकरे कुणावर काय-काय बोलणार? याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. सभेसाठी उद्धव ठाकरेदेखील पाचोऱ्यात दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com