
भाजप आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर हे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यांनी तुरुंगातील आरोपींकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर आता जालिंदर सुपेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.