Jalna Blast : स्टील कंपनीत भीषण स्फोट; ७ कामगारांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Blast
Jalna Blast : स्टील कंपनीत भीषण स्फोट; ७ कामगारांचा मृत्यू

Jalna Blast : स्टील कंपनीत भीषण स्फोट; ७ कामगारांचा मृत्यू

जालन्यातल्या औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटामध्ये जवळपास ७ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक कामगार या स्फोटात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालनामधल्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या गीताई स्टील या कंपनीत मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या कंपनीमध्ये स्टील वितळवण्याची भट्टी होती. या स्फोटामध्ये या भट्टीचे तुकडे झाले आहेत. यामध्ये सात कामगारांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती आहे.

या कंपनीमध्ये कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नव्हती, अशीही माहिती मिळत आहे. या आधीही या कंपनीमध्ये स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटांमध्ये काही कामगारांचा मृत्यू झाला असून काहींना कायमचं अपंगत्वही आलं आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Jalna