

Manoj Jarange Alleges Assassination Plot
Sakal
वडीगोद्री (जि. जालना) : ‘‘बीड जिल्ह्यातील दोन संशयितांना जालना पोलिसांनी अटक केल्यामुळे माझ्या हत्येचा कट व षड्यंत्र उघड झाले आहे. हत्येच्या कटासाठी अडीच कोटींचा व्यवहार झाला होता. त्याचे सूत्रधार माजी मंत्री धनंजय मुंडे आहेत, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली.