जालना आणि नागपूर शहर पोलिसांना 'सर्वोत्कृष्ट पोलिस युनिट' पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Police

जालना जिल्हा पोलिस आणि नागपूर शहर पोलिसांना 2021 साठी राज्यातील 'सर्वोत्कृष्ट पोलिस युनिट' पुरस्कार मिळाला आहे.

Police : जालना आणि नागपूर शहर पोलिसांना 'सर्वोत्कृष्ट पोलिस युनिट' पुरस्कार

मुंबई - कायदा व सुव्यवस्था राखणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, समुदाय पोलिसिंग आणि उत्कृष्ठ प्रशासन अशा विविध वर्गांतर्गत जालना जिल्हा पोलिस आणि नागपूर शहर पोलिसांना 2021 साठी राज्यातील 'सर्वोत्कृष्ट पोलिस युनिट' पुरस्कार मिळाला आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) कुलवंत सरंगल यांनी यासंदर्भात परिपत्रक जाहीर केल आहे. परिपत्रकातील विजेत्यांच्या यादीनुसार जालना पोलिसांना 'अ' वर्गात तर नागपूर पोलिसांना 'ब' वर्गात पुरस्कार मिळाला. पोलीस परिपत्रकानुसार, 6,100 पेक्षा कमी भारतीय दंड संहितेच्या केसेस असलेल्या पोलीस युनिट्सना 'वर्ग A' मध्ये गटबद्ध केले आहे, तर 6,100 पेक्षा जास्त नोंदणीकृत प्रकरण असलेल्या पोलीस युनिट्सना 'क्लास बी' मध्ये गटबद्ध केले आहे.

‘अ’ वर्गात रायगड जिल्हा पोलिसांना द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पोलीस तुकडीचा पुरस्कार मिळाला, सर्वात जास्त दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसाना सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट चा पुरस्कार मिळाला., बीड जिल्हा पोलीसाना तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर करणारी सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट आणि समुदाय पोलिसिंग उपक्रमांमध्ये गडचिरोली पोलिसांना सर्वोत्कृष्ट तुकडीचा पुरस्कार मिळाला.

‘ब’ वर्गात, पुणे शहर पोलिसांनी द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पोलीस युनिटचा पुरस्कार पटकावला, मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिसांनी पोलीसिंग तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट युनिटचा पुरस्कार पटकावला, तर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रकरणे आणि समुदाय पोलिसिंग उपक्रमांसाठी सर्वोत्कृष्ट युनिटचे दोन पुरस्कार पटकावले. याच श्रेणीतील औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी 2020 साठी 'अ' वर्गात सर्वोत्कृष्ट पोलिस युनिटचा पुरस्कार पटकावला होता.