Jalyukt Shivar Yojana: पैसै खालेल्या अधिकाऱ्यांवर महसुल विभागाची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारातील आरोपी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदाऱ्यांवर महसुल विभागाची मोठी कारवाई
Jalyukt Shivar Yojana officers
Jalyukt Shivar Yojana officersesakal

बीडच्या परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारातील आरोपी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदाऱ्यांवर महसुल विभागाने मोठी कारवाई केली आहे. (Jalyukt Shivar Yojana officers CM Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Politics )

आरोपी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी वसुलीची 4कोटी रुपयांची रक्कम अद्यापपर्यंत पूर्णतः भरली नाही. त्यामुळे महसूल विभागाने या प्रकरणातील सर्व आरोपींना रक्कम भरण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. ही रक्कम भरली नाही तर संबंधित अधिकारी-कंत्राटदारांच्या मालमत्तेवर महसुली बोजा चढवला जाणार आहे. त्यामूळे अधिकारी आणि गुत्तेदारांची धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

2016-17 या वर्षात परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजना आरोप करण्यात आला होता यात जलयुक्त शिवार प्रकरणातील आरोपी असलेल्या एकूण 24 अधिकारी, कर्मचारी व 129 कंत्राटदारांना 4 कोटी 83 हजार 347 रुपये भरण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Jalyukt Shivar Yojana officers
Pune Crime News : पुणं पुन्हा हादरलं! व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने जीभचं कापली

मात्र, चार वर्षांच्या कालावधीत 4 कंत्राटदारांनी केवळ 1 लाख 347 तर 16 अधिकाऱ्यांनी 40 लाख 17 हजार रुपये भरले आहेत. मोठ्या रकमा भरण्याची गती कमी असल्याने त्यांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com