Jay Pawar demands probe
ESakal
महाराष्ट्र बातम्या
Jay Pawar: ब्लॅक बॉक्स नष्ट होऊ शकत नाहीत; जनतेला सत्य जाणून घेण्याचा हक्क, सूचक वक्तव्य करत जय पवारांची मोठी मागणी
Jay Pawar News: अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. तसेच व्हीएसआरला तात्काळ उड्डाणे चालविण्यास बंदी घालावी, अशी जय पवारांकडून मागणी करण्यात आली आहे.
आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांचे विमान इंधनाने भरलेले होते आणि विमानात अतिरिक्त इंधनाचे डबे साठवले गेले होते. शिवाय उड्डाण थांबवण्यात आले. या प्रकरणात व्हीएसआर कंपनीला संरक्षण दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. यानंतर आता अजित पवारांचे सुपुत्र जय पवारांनी याबाबत जय पवारांनी मोठी मागणी केली आहे.

