
नाशिकच्या संततधारेने 65 टक्के भरले पैठणचे जायकवाडी धरण
नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच धरण आता भरत आली आहेत. नाशिक येथील गंगापूर धरणही आता पुरते भरले असून मोठ्याप्रमाणावर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. (Nashik Rain Updates)
हेही वाचा: Maharashtra Rain: पावसाचा मोठा फटका, नोटा भिजल्याने चक्क 12 लाख पाण्यात
नाशिकहून पाणी पोहोचले पैठणला...
संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील गंगापूर धरण भरत आले असून धारण्यातून मोठ्याप्रमाणावर गोदेच्या पात्रता पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोदावरी नदीत सोडलेले पाणी हे वाहात जायकवाडी धरणाच्या दिशेने जाते. या संततधार पावसामुळे गोदावरी पात्रातून मोठा पाणीसाठा हा जायकवाडीच्या दिशेने गेला असून आता गंगापूर पाठोपाठ महाराष्ट्रातील विशाल धरण म्हणून नावलौकिक असलेले जायकवाडी धरणही आता जुलै महिन्यातच 65 टक्के भरले आहे. (Latest Marathi News)

हेही वाचा: Mumbai Rain : पुढील २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
आज रात्री 10 वाजता यासंदर्भातील रिपोर्ट पुढे आला आहे. यानुसार जायकवाडी धरण हे 65 टक्के भरले आहे.
Web Title: Jayakwadi Dam Paithan Fill 65 Percent Due To Heavy Rain In Nashik District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..