Jayant Patil : साडेनऊ तास ईडीच्या कार्यालयात नेमकं झालं काय? जयंत पाटलांनीच दिलं स्पष्टीकरण

Jayant Patil
Jayant Patil
Updated on

मुंबईः 'आयएलएफएस'शी संबंधीत आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज ईडीने चौकशी केली. मात्र ही चौकशी एक-दोन नव्हे तर तब्बल साडेनऊ तास चालली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

जयंत पाटील हे सकाळी साडेआठ वाजता ईडी कार्यालयात चौकशीला गेलेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ईडी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर पाटील यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसत नव्हता उलट ते हसतमुख चेहऱ्यानं बाहेर आलेले दिसले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदही घेतली.

Jayant Patil
Jayant Patil ED Enquiry: तब्बल 9 तासांनंतर जयंत पाटलांची ईडी चौकशी संपली; बाहेर येताच म्हणाले, आता प्रश्न...

जयंत पाटील म्हणाले की, ईडीच्या अधिकाऱ्यांचं समाधान मी केलेलं आहे आणि ते बोलावतील तेव्हा मी जाईन, मात्र आता त्यांचं समाधान झालेलं आहे असं माझं मत आहे. माझा आयएलएफएस नावाच्या संस्थेशी कधीही संबंध आलेला नाही. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत.

Jayant Patil
Ayodhya Ram Mandir: ठरलं! 'या' तारखेपर्यंत भाविकांना करता येणार श्रीरामची पुजाअर्चा; मंदिर समितीची घोषणा

साडेनऊ तास आतमध्ये नेमकं काय झालं? या प्रश्नावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, पूर्ण दिवस गेला, कारण प्रत्येक प्रश्नाचं लिखित स्वरुपात उत्तर दिलं जात होतं. ते उत्तर पुन्हा टाईप होणं, ते दुरुस्त करणं. ही प्रक्रिया चालते. मी चौकशीला पूर्ण सहकार्य करायचं ठरवलं होतं. मात्र त्यांचा प्रक्रियेला वेळ लागतो त्यामुळे तेवढा कालावधी जातोच.

अर्ध पुस्तक वाचून काढलं- जयंत पाटील

उत्तर दिल्यानंतर त्यांची प्रक्रिया सुरुच होती. मी मात्र या वेळेत 'शिवकालीन महाराष्ट्र' हे पुस्तक अर्ध वाचून काढलं. त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. महाराष्ट्रातली लोकं जागरुक, सुजाण आहेत. सर्वांना सगळं कळेलच. असं शेवटी जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is the Shaktipeeth Highway project?
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com