esakal | ...तर भाजपला ५० पेक्षा कमी जागा मिळतील - जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant-Patil

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र लढलो तर भारतीय जनता पक्षाला ५० पेक्षाही कमी जागा मिळतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पुण्यात केले. कोरोनाची स्थिती पाहता भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्राचा दौरा करण्याचे टाळायला हवे, असा सल्लाही पाटील यांनी दिला. 

...तर भाजपला ५० पेक्षा कमी जागा मिळतील - जयंत पाटील

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र लढलो तर भारतीय जनता पक्षाला ५० पेक्षाही कमी जागा मिळतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पुण्यात केले. कोरोनाची स्थिती पाहता भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्राचा दौरा करण्याचे टाळायला हवे, असा सल्लाही पाटील यांनी दिला. 

'तो' बोर्ड हटविण्यासाठी शिर्डीला जाणारच; तृप्ती देसाईंचा इशारा

येत्या १२ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमांची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सर्वत्र कार्यक्रम होणार नाहीत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पक्षाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम होईल. त्याचे प्रक्षेपण राज्यातील प्रत्येक तालुक्‍यापर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील. राज्यात रक्तदान शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुण कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे.’’

‘म्हाडा’साठी आजपासून नोंदणी;ऑनलाइन सोडत जानेवारीमध्ये

ऑनलाइन सोहळा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने १२ डिसेंबरला वाढदिवसाचा ‘ऑनलाइन’ सोहळा आयोजित केला आहे. मुंबईत होणारा मुख्य कार्यक्रम एकाचवेळी राज्यातील ३६ जिल्हे व ३५० तालुक्‍यात पाहता येणार आहे. पवार यांच्या जीवनातील आठ दशकांचा आढावा घेताना समाजातील सर्व घटकांना सामावून घेणार आहोत.

Edited By - Prashant Patil

loading image