'तो' बोर्ड हटविण्यासाठी शिर्डीला जाणारच; तृप्ती देसाईंचा इशारा

Trupti_Desai
Trupti_Desai

पुणे : भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना प्रशासनाने शिर्डी नगरपंचायत हद्दीत शुक्रवार (ता.11) पर्यंत प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. मात्र, शिर्डी संस्थानने पेहरावाबाबत लावलेला फलक काढण्यासाठी आम्ही शिर्डीला गुरुवारी 10 डिसेंबरला जाणारच, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. 

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी सूचना साईबाबा संस्थानने भाविकांना केली आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे. भूमाता ब्रिगेडच्या देसाई यांनी संस्थानने पलक न काढल्यास आम्ही शिर्डीत येऊन तो पलक काढू, असा इशारा दिला होता. परंतु हा पलक काढण्यात आलेला नाही. त्यामुळे देसाई यांनी तो काढण्यासाठी शिर्डीला जाणार असल्याचे पत्र संस्थानला पाठविले होते. 

या वादामुळे स्थानिक प्रशासनाने शिर्डी प्रवेशावर बंदी घालत आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. परंतु देसाई यांनी आपल्या आंदोलनावर ठाम असून, शिर्डीला जाणार आहोत. लोकशाहीत संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे, तो हिरावून घेऊन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाविकांचे व्यक्‍ती स्वातंत्र्य हिरावण्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. आमचा आवाज दबला जाणार नाही. आम्ही शिर्डीला जाणारच, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com