

सांगली: ' जगावं की मरावं'हा ‘हॅम्लेट’मधील सवाल सर्वसामान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारत आहेत. मोदीजी तुम्ही महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्याचं जगणं नकोसे केलेय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केंद्र सरकारवर निशाणा साधला. समाजमाध्यमावर पक्षाच्या वेबपेजवरून त्यांनी आपल्या निवेदनाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन करीत या प्रश्नी उद्यापासून दोन दिवस तालुका आणि जिल्हास्तरावर निषेध आंदोलनाचे आदेशही दिले आहेत.jayant-patil-criticism-on-central-government-gas-cylinder-trending-political-marathi-news
पाटील म्हणतात, ‘‘ केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवलाय. जगावं की मरावं या प्रश्नावर आता मन की बातचं उत्तर दिसतंय की सर्वसामान्य माणसाने मरावंच. मुंबईत घरगुती गॅस सिंलिंडरची किंमत ८०९ रुपये झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकाच्या इंधनाचा महिन्याचा खर्च मोदींनी दीड हजार रुपये केला आहे. हे सरकार ढिम्म असून पेट्रोल शंभरीपार गेले तरी त्यावर उपाययोजना करायला ते तयार नाहीत. केवळ निवडणुकीपुरतंच गिमिक करायचं. थोडी दरवाढ नियंत्रित करायची आणि निवडणुका संपल्या की सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडायचं हा भाजपाचा खाक्या आहे. पेट्रोल १०६ रुपये तर डिझेलही शंभरीचा पल्ला गाठत आहे. मात्र या सरकारची कातडी इतकी निब्बर झाली आहे की त्यांना कशाचेच काय उरलेले नाही. लोकांच्या तोंडचं अन्नही ते हिरावून घेत आहेत. हेच का त्यांचे अच्छे दिन. हेच भाजपवाले पुर्वी इंधन दरवाढीवरून आकाश पाताळ एक करायचे. सरकारच्या नावाने खडे फोडायचे. ’’
ते पुढे म्हणतात.‘‘ गेल्या दीड वर्षांत कोविडमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या मिळकतीमध्ये मोठी कपात झाली आहे. घरखर्च कसा भागवायचा ही प्रत्येकासमोरची समस्या असताना असंवेदनशील केंद्र सरकार मात्र मूग गिळून बसलं आहे. त्यांना कुठलीच संवेदनशीलता राहिलेली नाही. त्यांना बोलते करण्यासाठी रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोविड निर्बंधाचे सगळे विहित नियम पाळून उद्या व परवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्याच्या ठिकाणी या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करतील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.