
बाबरी मशिदीतून फडणवीस पळून आले होते का?
सांगली - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र आहेत, आमच्या अनेकदा गप्पा रंगल्या, मात्र त्यांनी कधीही ते बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते, असे सांगितले नाही. जर ते तेथे गेले होते तर कुठे उभे राहिले होते, त्यांना दगड वगैरे लागले का? त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता का... की ते तेथून पळून आले होते, याची माहिती त्यांनी मला सहज गप्पा मारता मारता द्यावी, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केली.
श्री. फडणवीस यांनी बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडायला मी होतो, असा दावा काल केला आहे. त्याबाबत जयंत पाटील म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझ्या अनेकदा गप्पा रंगल्या होत्या, मात्र कधीतरी त्यांनी हे मला सांगायला हवे होते. ही काही छोटी गोष्ट नाही. त्यांनी ते सांगितले नाही म्हणजे ते खोटे बोलत आहेत, हे स्पष्ट आहे. बाबरी पाडून किती वर्षे झाली? त्यांचे वय किती होते? ते २१-२२ वर्षांचे होते तर मग लालकृष्ण अडवाणींनी या तरुणाला त्याच्या करिअरची चिंता न करता तिकडे कशाला नेले? या सगळ्या गप्पांना अर्थ नाही. त्यावेळीच बाबासाहेब ठाकरे यांनी त्या गोष्टीची जबाबदारी घेतली होती. आता कुणी काही दावा करून काही होणार नाही.’’
Web Title: Jayant Patil Criticizes On Devendra Fadnavis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..