
भाजपने बुजगावणी उभी केलीत
सांगली - मार्कस् म्हणायचा धर्म ही अफूची गोळी आहे. भाजपने सध्या देशाला ही अफूची गोळी देऊन मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काही बुजगावणी उभी करून जे आण स्वतः करून शकत नाही, ते त्यांच्याकडून करवून घेतले जात आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी तोफ लागली.
ते म्हणाले, ‘‘देशातील मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. मध्यवर्गीय, गरिबांना महागाईने घेतले आहे. संसार कसा करायचा हा लोकांपुढे प्रश्न आहे. अशावेळी धर्म नावाची अफूची गोळी दिली जात आहे. काही काळ माणूस त्या गुंगीत राहिल, मात्र रात्री झोपण्याआधी त्याला उद्याचा दिवस कसा काढायचा, याची चिंता नक्की वाटते आहे. सामान्यांचा भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे भोंगे वाजवले जात आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने जे काही नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन करून भोंगे लावायला हरकत असण्याचे कारण नाही. तो नियम जो कोणी मोडेल, तो कोणत्याही धर्माचा असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. मनसेने या विषयात दंगा करायचा ठरवला असेल तर त्यांची राज्यभर एवढी ताकद नाही. त्यामुळे त्यांना अन्य पक्षातून मदत झाली तर ते काही करू पाहतील, मात्र पोलिस सक्षम आहेत, ते बंदोबस्त करतील.’’
पडळकरांना टोला
आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप नेत्यांना केंद्राकडून झटपट संरक्षण दिले जात आहे. त्याविषयी जयंत पाटील म्हणाले, ‘‘या लोकांना कदाचित अतिरेक्यांपासून धोका असण्याची शक्यता आहे. त्यांना दाऊदचा फोन आला असू शकतो. त्याचे कुणाशी काही गंभीर बिनसलेले असू शकते.’’
Web Title: Jayant Patil Criticizes On Raj Thachrey
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..