Jayant Patil : ''मी गरीब माणूस, माझा कुणाशीही वाद नाही'', अंतर्गत कलहाच्या चर्चांवर जयंत पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला आमदार रोहित पवार यांची अनुपस्थिती असल्याने पक्षांतर्गत कुजबुज सुरु झाली आहे.
Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला आमदार रोहित पवार यांची अनुपस्थिती असल्याने पक्षांतर्गत कुजबुज सुरु झाली आहे. त्यावरुन जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं असून माझा कुणाशीही वाद नाही, असं म्हटलं आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

रोहित पवार हे परदेशात गेल्याने बुधवारी शिबिराला अनुपस्थित होते. त्यामुळे पक्षात रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा वाद सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पवारांच्या अनुपस्थितीबद्दल जयंत पाटील म्हणाले की, रोहित पवार हे परदेशात गेले आहेत. त्यामुळे ते आज किंवा उद्या उपस्थित राहतील.

Jayant Patil
SA vs IND 2nd Test : शेवटच्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहितने संघात केले मोठे बदल! अश्विन-शार्दुल बाहेर, या खेळाडूंना मिळाली संधी

पाटील पुढे म्हणाले, मी गरीब माणूस आहे. माझा कुणाशीही वाद नाहीये. जे बरोबर येतील त्यांच्यासोबत काम सुरु आहे. दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळामध्ये रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्याबद्दल कुजबुज सुरु झाली.

Jayant Patil
छगन भुजबळांनी सावित्रीबाईंना अभिवादन केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक; पुतळ्याचे शुद्धीकरण!

यावरुन प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सध्या राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे कोण कधी बाहेर पडेल, हे सांगता येत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पक्षामध्ये येण्यासाठी अनेक नेते रांगेमध्ये आहेत. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या या विवादांमुळे नेमकं काय सुरुय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is the Shaktipeeth Highway project?
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com