Jaydatta Kshirsagar : मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'Welcome'साठी जयदत्त क्षीरसागर हेलिपॅडवर हजर, पण सभेला मात्र गैरहजर!

Jaydatta Kshirsagar Politics : जयदत्तअण्णांची नेमकी भूमिका तरी काय? समर्थक, कार्यकर्ते संभ्रमात; नगरपालिका निवडणुकीत कुणाच्या बाजूने असणार?
Jaydatt Kshirsagar seen welcoming Devendra Fadnavis at the Beed helipad but absent from the main rally, increasing political speculation among party workers.

Jaydatt Kshirsagar seen welcoming Devendra Fadnavis at the Beed helipad but absent from the main rally, increasing political speculation among party workers.

esakal

Updated on

Beed Politics and Jaydatta Kshirsagar Role : माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर मागील अनेक दिवसांपासून कुठल्याच पक्षात नसल्याने, ते यंदाच्या नगरपालिका निवडणूकीपासूनही दूर असल्याचे दिसून येत आहेत. मात्र त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांसह त्यांना मानणारा मोठा मतदारवर्ग सध्या संमभ्रमातच दिसत आहे.

कारण, काही दिवसांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना साथ देणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड येथे सभेसाठी आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी बीडमधील हेलिपॅडवरही हजेरी लावली. मात्र पक्ष प्रवेश झालेला नसल्याने ते सभेच्या ठिकाणी मात्र गैरहजर होते. यामुळे त्यांचे चांगलेच गोंधळात पडले होते. नेमकी जयदत्त अण्णांची भूमिका तरी काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

मागील नगरपालिका निवडणुकांचा इतिहास जर पाहिला तर जयदत्त क्षीरसागर ज्याच्या बाजूने असतील  त्याच्याच अंगावर गुलाल पडल्याचे दिसून आले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीपासून नव्या पिढीने राजकारणात जोर लावल्याने अण्णा थोडी बॅकफूटवर गेल्यासारखे दिसत आहे.

Jaydatt Kshirsagar seen welcoming Devendra Fadnavis at the Beed helipad but absent from the main rally, increasing political speculation among party workers.
Government Mandatory Preload APP : मोबाइल चोरी झाला, हरवला तरी 'No Tension'; सरकारी आदेशानुसार आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असणार 'हे' खास 'APP'

 विधानसभा निवडणुकीत भावाभावात सरळसरळ लढत बीडमध्ये झाली. त्याही निवडणूकीत कुठल्याच पक्षाचं झेंडा हातात न घेता बाहेरून जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला. त्यानंतर आता नगरपालिका निवडणूक दरम्यान तेच चित्र असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेलकमसाठी हेलिपॅड ग्राउंडवर हजेरी लावत स्वागत केले, मात्र सभेत गैरहजर राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com