Government Mandatory Preload APP : मोबाइल चोरी झाला, हरवला तरी 'No Tension'; सरकारी आदेशानुसार आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये असणार 'हे' खास 'APP'

Sanchar Sathi App mandatory on all smartphones : या आदेशाचा परिणाम ॲपल, सॅमसंग, व्हिवो, ओप्पो आणि शाओमी सारख्या कंपन्यांवर होणार आहे.
Mobile Theft
Mobile Theftsakal
Updated on

What Is the Sanchar Sathi App? : भारत सरकारने सर्व स्मार्टफोन कंपन्यांना नवीन मोबाईल फोनवर सरकारचे सायबरसुरक्षा ॲप‘संचार साथी’ हे अनिवार्यपणे प्रीलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. खासगीरित्या जारी केलेल्या या आदेशामुळे ॲपलसारख्या कंपन्यांशी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे, जे सामान्यतः सरकारी ॲप्स प्री-इंस्टॉल करण्याची परवानगी देत ​​नाही.

भारत जगातील सर्वात मोठ्या फोन बाजारपेठांपैकी एक आहे, जिथे तब्बल १.२ अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये लाँच झालेल्या या ॲपने ७ लाखांहून अधिक हरवलेले फोन पुन्हा मिळवण्यात मदत केली आहे, तर ज्यामध्ये केवळ ऑक्टोबरमधील ५० हजार फोन समाविष्ट आहेत. या आदेशाचा परिणाम ॲपल, सॅमसंग, व्हिवो, ओप्पो आणि शाओमी सारख्या कंपन्यांवर होईल.

२८ नोव्हेंबरच्या आदेशानुसार, प्रमुख स्मार्टफोन कंपन्यांना सर्व नवीन फोन ९० दिवसांच्या आत "संचार साथी" सह प्रीलोड केलेले आहेत याची खात्री करून घ्यावी लागणार आहे. त्यात असेही म्हटले आहे की युजर्स ॲप अनइंस्टॉल करू शकणार नाहीत. जे फोन आधीच सप्लाय चेनमध्ये गेले आहेत, त्यामध्ये हे ॲप सॉफ्टवेअर अपडेटद्वारे पाठले जाईल. 

Mobile Theft
Renuka Chowdhury Enter Parliament With Dog : काँग्रेस खासदार रेणुका चौधरी पाळीव श्वानासह पोहचल्या संसदेत, अन् म्हणाल्या...

प्राप्त माहितीनुसार, ॲपल आपल्या फोनमध्ये केवळ आपल्याच कंपनीचे ॲप प्रीलोड करते. त्यांचे धोरण कोणत्याही सरकारी किंवा थर्ड पार्टी ॲपला प्री-इंस्टॉल करण्याची परवानगी देत नाही. तर सरकारच्या या निर्णयावर ॲपल, सॅमसंग, शाओमी यांनी तूर्तास तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवाय, टेलिकॉम मंत्रालयाकडूनही काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.

Mobile Theft
Leopard Safety Tips : अचानक बिबट्या दिसला तर काय करायचं..? ; सुरक्षित राहण्यासाठी पाळा वनविभागाच्या 'या' सूचना

संचार साथी ॲपचे फायदे कोणते? –

संचार साथी ॲपमध्ये यूजर्स संशयित कॉलची तक्रार करू शकतात. IMEI नंबर चेक करू शकतात आणि चोरी झालेला किंवा हरवलेल्या फोनला ब्लॉकही करू शकतात. विशेष म्हणजे हे ॲप लॉन्च झाल्यापासून यास तब्बल ५० लाखांहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. याद्वारे ३.७ लाखांपेक्षा अधिक चोरी झालेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक झाले आहेत. तसेच तब्बल तीन कोटींपेक्षा अधिक बनावट कनेक्शनही बंद करण्यात आले आहेत.

सरकारचे म्हणणे आहे की, हे ॲप सायबर धोक्यास रोखणे, चोरी झालेला फोन सापडणे आणि बनावट फोन बाजारात येण्यापासून रोखण्यात मोठी भूमिका बजावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com