
जयकुमार गोरे यांना राजकीय जीवनातून उठवायचे प्रयत्न करण्यात आले, यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा हात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले की, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची ज्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे ते प्रकरण पुन्हा उकरुन काढून त्यांना बदनाम करण्याचे काम केले पण, त्यांनी धीराने याला तोंड दिले. मी त्यांच्या हिमतीची दाद देतो असं सीएम म्हणाले.