Jaypee Cement : एकेकाळी होता फक्त 218 रुपये पगार; आज देशाच्या कोट्याधीशांच्या यादीमध्ये आहे नाव

परिश्रम आणि महत्वाकांक्षेच्या बळावर माणूस काहीही करू शकतो
Jaypee Cement
Jaypee Cement esakal

hJaypee Cement : परिश्रम आणि महत्वाकांक्षेच्या बळावर माणूस काहीही करू शकतो. भारतात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सीमेंट कंपनीपैकी एक म्हणजे जेपी सीमेंट कंपनी होती. ही कंपनी फक्त 218 रुपयांची नोकरी असलेल्या एका इंजिनियरने सुरू केली होती.

Jaypee Cement
Cancer Vaccine : खुशखबर! कॅन्सरचा धोका टळला; डॉक्टरांनी शोधल वॅक्सिन

जेपी अर्थात जयप्रकाश असोसिएट्स सिमेंट प्लांट ही कंपनी जयप्रकाश गौर यांनी सुरू केलेली. त्यांचा जन्म 1931 मध्ये यूपी मध्ये झाला. जयप्रकाश हे मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले होते, त्यांनी रुरकी मधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण करून नोकरी लागली तेव्हा त्यांना फक्त २१८ रुपये पगार मिळात होता.

Jaypee Cement
Couple Goals : हेल्दी रिलेशनशिपसाठी 2023 मध्ये करा या गोष्टींच पालन

त्यावेळी बेटवा नदीवर धरण बांधण्याचे काम सुरू होते, ते या प्रोजेक्ट मध्ये काम करत होते, त्यांच्या लक्षात आलं की ज्या कामासाठी त्यांना फक्त 218 रुपये पगार मिळतो आहे तेच काम करून कॉंट्रॅक्टर सुमारे 5 हजार रुपये कमावता आहेत. त्यांनी ठरवलं की नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा.

Jaypee Cement
Sanjay Gandhi Death Anniversary : लेकाची गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून इंदिरा गांधी खुश झाल्या

खिशात फक्त होते 100 रुपये

एका मुलाखतीमध्ये जेपी गौर यांनी सांगितलेल की, जेव्हा ते आपली डिगरी घेण्यासाठी बाहेर पडले तेव्हा त्यांच्याकडे फक्त 100 रुपये होते. स्वप्नं खूप होती, पण सुरुवात कुठून करायची हा प्रश्न होताच. लगेच मिळेल ते यश कसले? सततच्या परिश्रमानंतर त्यांनी करोडोंची उलाढाल असलेली कंपनी उभी केली.

Jaypee Cement
Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

याविषयी अधिक बोलतांना ते म्हणाले की माझ्या आजूबाजूचे लोकं हे खूप अवघड काम आहे नको करूस हे सुचवत होते; पण काम अवघड असू शकतं अशक्य नाही यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. ते काम करत राहिले, 1979 मध्ये इराकमध्ये 250 कोटी रुपयांचे काम मिळालं होतं, 20 कोटींची बँक गॅरेंटीची गरज होती. तेव्हा कंपनीच बॅलेन्स शीट कमी होतं, बँकवाल्यांनाही जरा आश्चर्यच वाटलं होतं, शेवटी त्यांच काम झालं.

Jaypee Cement
Parenting Tips : ट्रॅव्हल, फूड नव्हे तर, पॅरेंटिंगच्या 'या' टिप्स ठरल्या 2022 मध्ये हीट

फोर्ब्सच्या यादीत आलं नाव

जेपी कंपनीने खूप प्रगती केली होती, 2010 मध्ये, फोर्ब्स मॅगझिनच्या भारतातील अब्जाधीशांच्या यादीत जयप्रकाश 48 व्या क्रमांकावर होते. तेव्हा त्यांची एकूण संपत्ती १.५ अब्ज डॉलर होती. यानंतर 2012 मध्ये त्यांना फोर्ब्स मॅगझिनमध्ये पुन्हा स्थान मिळाले, पण यावेळी त्यांची रँकिंग आणि संपत्ती दोन्ही घसरले. भारतातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांना 70वे स्थान मिळाले आहे. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती $855 दशलक्ष होती.

Jaypee Cement
Crude Oil : इराक, सौदी अरेबिया ना अमेरिका, भारत घेतोय "या" देशाकडून सर्वात जास्त क्रूड ऑइल

आता ही कंपनी कर्जबाजारी झाली आहे आणि कंपनी विकली जाणार आहे. 2016 च्या सुरुवातीला अल्ट्राटेकने जेपी सिमेंटचे काही प्लांट विकत घेतले होते. आता परत दालमिया सिमेंट लिमिटेड जेपी सिमेंट 5,666 कोटींना विकत घेतली आहे. दालमिया सिमेंटसोबत झालेल्या करारानंतर जेपी सिमेंटचा व्यवसाय आता पूर्णपणे बंद झाला आहे.

Jaypee Cement
Tandalachi Kheer Recipe: सोमप्रदोषा निमित्त बनवा खास तांदळाची खीर, महादेवांना दाखवा नैवेद्य

जेपी गौर यांच्या प्रवासावर एक नजर

1981 मध्ये जेपी ग्रुपने पहिले हॉटेल सुरू केले, ज्याच नाव सिद्धार्थ होते. 1987 मध्ये, जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडची BSE मध्ये नोंदणी झाली. 1992 मध्ये कंपनीने जलविद्युत क्षेत्रात प्रवेश केला. 1986 मध्ये जेपी सिमेंट सुरू केले. जेपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी 2001 मध्ये सुरू झाली. वर्ष 2008 मध्ये, कंपनीने जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनसह एक मोठे यश मिळवले. त्याचा प्रवास इथेच थांबला नाही. 2011 मध्ये त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला. 2014 मध्ये, जेपीने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसह आरोग्य क्षेत्रात देखील प्रवेश केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com