Jitendra Awhad Arrest : पोलिसांवर दबाव टाकतायत; आव्हाडांच्या पत्नीचा श्रीकांत शिंदेंवर आरोप?

जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी आव्हाडांच्या पत्नीने आरोप केले आहेत.
Jitendra Awhad Shrikant Shinde
Jitendra Awhad Shrikant ShindeSakal

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल ठाणे पोलिसांनी अटक केली. ठाण्यात चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. मात्र यामागे पोलिसांवर दबाव असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांच्या पत्नी हृता यांनी केला आहे.

हेही वाचा - हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी हृता आव्हाड यांनी याबद्दलचं ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी खासदार श्रीाकांत शिंदे यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. तसंच त्यांनी ठाण्याच्या माजी महापौरांचाही उल्लेख केला आहे. हृता आव्हाड म्हणतात, "डॅा. खासदार व ठाण्याचे माजी महापौर पोलिसांवर दबाव आणत आहेत? हे खरं नसावंच. पण अशी कुजबुज आहे पोलीस स्टेशनच्या आवारात"

Jitendra Awhad Shrikant Shinde
Jitendra Awhad Arrest: गोड गप्पांमध्ये गुंतवलं, अन्…; आव्हाडांनी सांगितला अटकेपूर्वीचा नाटकीय घटनाक्रम

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण्यातल्या विवियाना मॉलचे व्यवस्थापक आणि सिनेपोलिस चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप हृता यांनी यापूर्वी केला होता. तसंच गुन्हा दाखल केलेल्यांपैकी कोणीही घटनास्थळी उपस्थित नव्हतं, असंही हृता यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com