esakal | चाळीत लहानपण गेलेल्या आव्हाडांकडे गृहनिर्माण मंत्रीपद
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-1.jpg

ताडदेवमधील श्रीपत भवन या चाळीतील खोली क्रमांक 6 मध्ये वाढलेले जितेंद्र आव्हाड आज राज्याच्या गृहनिर्माणमंत्री पदापर्यंत पोचले आहेत. 

चाळीत लहानपण गेलेल्या आव्हाडांकडे गृहनिर्माण मंत्रीपद

sakal_logo
By
संजय मिस्किन

मुंबई : अख्ख लहानपण मुंबईच्या दहा बाय दहाच्या खोलीत घालवलेला एका चाळीमध्ये वाढलेला व्यक्ती आज महाराष्ट्राच्या गृहनिर्माण मंत्रीपदी विराजमान झाला आहे. 

ताडदेवमधील श्रीपत भवन या चाळीतील खोली क्रमांक 6 मध्ये वाढलेले जितेंद्र आव्हाड आज राज्याच्या गृहनिर्माणमंत्री पदापर्यंत पोचले आहेत. 
आव्हाड यांचे बालपण एकाच सामान्य गिरणी कामगाराच्या कुटुंबात गेले. आपल्या मुलाने शिक्षण करावे आणि सनदी अधिकारी व्हावे अशी आई-वडिलांची इच्छा होती. पण महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थी राजकारणात आव्हाड यांना जास्त रस होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, काही काळ त्यांनी यूपीएससी या परीक्षेचाही अभ्यास केला. पण दरम्यानच पद्मसिंह पाटील शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संपर्कात विद्यार्थी नेता म्हणून ते आले आणि त्यातूनच आव्हाड यांचे राजकीय जीवन सुरू झाले. युवा नेता ते विद्यार्थी नेता आणि आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ग्रहनिर्माण मंत्री असा आव्हाड यांचा प्रवास निश्चितच एका सामान्य कुटुंबातील तरुणाला प्रोत्साहित करणारा असल्याचे मानले जाते.

सत्तारांची शंभर टक्के मनधरणीत यश : पहा कोण म्हणतंय

आई-वडिलांनंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांना सर्वस्व मानतात. पवारांमुळेच राजकारणात एका गिरणी कामगाराच्या घरातील तरुणाला संधी मिळाल्याचे ते कबूल करतात. आताही गृहनिर्माण मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी ट्विटरवर खोली क्रमांक 6, श्रीपत भवन, ताडदेव, मुंबई असा लहानपणीचा पत्ता टाकला आहे आणि हा चाळीतील मुलगा राज्याचा गृहनिर्माण मंत्री झाला हे सर्वस्वी केवळ शरद पवार यांच्यामुळे शक्य आहे अशी कृतज्ञता आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईतील चाळी अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. जीव मुठीत घेऊन राहणारे लाखो कुटुंब येथे राहतात. सर्वसामान्य कामगार आणि मराठी माणसे राहत असलेल्या चाळींचा विकास करणे. तेथील चाकरमानी, कामगार यांना हक्काचे घर मिळवून देणे आणि डोक्यावरचे छत्र सुरक्षिक करण्याची जबाबदारी आव्हाड यांच्यावर असणार आहे. एका चाळीत राहिलेला व्यक्ती मंत्री झाल्याने या वेदनांची कदर आव्हाड नक्कीच असेल अशी आशा आहे.