घरावर मोर्चा आल्यास पोलिसांनी बंदोबस्त करावा, अन्यथा.. : आव्हाड

Jitendra Awhad
Jitendra AwhadJitendra Awhad Twitter Account

ओबीसी समाजाबाबत विधान केल्याने अडचणीत सापडलेले राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी गंभीर आरोप केले आहेत. "बुधवारी माझ्या घरावर मोर्चा येणार असल्याचं समजतंय. त्यासाठी पुण्यातून दोन बस मागविण्यात आल्या आहेत. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा.., असं आव्हाड यांनी म्हटले आहे. (Jitendra Awhad remarks on OBC sparks row in Maharashtra)

Jitendra Awhad
पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडीला प्रश्न, म्हणाल्या-ओबीसी आरक्षणाचे काय?

आव्हाड यांनी नुकतेच सावित्रीच्या लेकींच्या सन्मान सोहळ्यात ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केले होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी, यासाठी ओबीसी समाजाने लढायला हवे होते, पण त्या वेळेस मैदानात दलित वर्ग उतरला होता. ओबीसी मात्र मागे होते. कारण त्यांच्यावर ब्राह्मणवादाचा पगडा आहे, असे विधान आव्हाड यांनी केले होते. आपण श्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटते, पण चारपाच पिढ्यांपूर्वी आपल्या पूर्वजांना मंदिरप्रवेश नव्हता हे ते विसरलेत, असंही आव्हाड यांनी म्हटले होते. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना मैदानात उतरावेच लागेल, असं आवाहन त्यांनी भाषणात केले होते. त्यांच्या त्या भाषणाचे व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. या पार्श्वभूमीवर भाजपा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Jitendra Awhad
राज्यात ओबीसी लोकसंख्या ४० टक्के?

मंगळवारी रात्री उशिरा आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, “उद्या (बुधवारी) माझ्या घरावर मोर्चा येणार आहे असे समजले. त्यासाठी 2 बस पुण्याहून मागविण्यात आलेल्या आहेत. एकाला सांगितले आहे कि तू माजीवाडा नाक्यावर उतर आणि दुसऱ्याला कॅडबरी जंक्शन जवळ उतरायला सांगितले आहे. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा. अन्यथा....... जय भीम!”

भाजपने काय म्हटले होते?

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना सत्तेची ऊब मिळाल्याने ते आता ओबीसी बांधवांना विसरले आहेत. त्याचमुळे ओबीसींवर माझा विश्वास नाही, ओबीसींना लढायचेच नसते, अशी अपमानकारक विधाने आव्हाड करीत असल्याची टीका भाजप राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे सदस्य व मुंबई भाजप सचिव प्रतीक कर्पे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com