पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडीला प्रश्न, म्हणाल्या-ओबीसी आरक्षणाचे काय? | Pankaja Munde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde
पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडीला प्रश्न, म्हणाल्या-ओबीसी आरक्षणाचे काय?

पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडीला प्रश्न, म्हणाल्या-ओबीसी आरक्षणाचे काय?

जिंतूर (जि.परभणी) : ओबीसी आरक्षणाच्या ठरावाचे भविष्य काय असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला. जिंतूर तालुक्यातील धमधम येथे संतश्री भगवान बाबा व विठ्ठल रुख्मिण मुर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा सोमवारी (ता.२७) पार पडला. यानिमित्त मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्न सोडविण्यापर्यंत निवडणुका घेऊ नये असा ठराव सर्वानुमते विधानसभेत घेतला खरा, मात्र या ठरावाचे भविष्य काय ? असा सवाल केला. कार्यक्रमास आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्यासह साधुसंतांची उपस्थिती होती़. (Pankaja Munde Attack On Mahavikas Aghadi Government, Said What About OBC Reservation)

हेही वाचा: Omicron In Nanded : नांदेडमध्ये आफ्रिकेतून आलेल्या दोघांना ओमिक्राॅनची बाधा

यावेळी महाराष्ट्रातील आघाडी सरकावर टीका करताना मुंडे म्हणाल्या ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) गांभीर्य नाही. आधी इंम्पिरिकल डाटा कोण देणार यावर वाद घातला, त्यानंतर न्यायालयात वेळ मागीतला. पण वेळ मागे घेतला तोपर्यंत निवडणुका न होऊ देणे ही जबाबदारी आघाडीची होती आहे़. विधानसभेत ओबीसी आरक्षण प्रश्नावर निवडणुका घेऊ नये असा ठराव पारित करण्यात आला. मात्र या ठरावाचे भविष्य काय? निवडणूक आयोगाने केराची टोपली दाखवली तर काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे़. या प्रश्नावर सरकार व सर्व आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. आता नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या नंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लागतील.

हेही वाचा: काही दिवसच शिल्लक राहिलेत, लवकर खरेदी करा Heroच्या बाईक्स

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपंचायतीच्या, ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत अनेक जागांवर ओबीसी उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला आहे असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमासाठी जिंतूर, सेलु तालक्यासह परभणी जिल्ह्यातील विविध भागातील ओबीसी संघटनांचे, भगवानबाबा युवक संघटनेचे,भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मुंडे समर्थक व पंचक्रोशीतील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Pankaja Munde Attack On Mahavikas Aghadi Government Said What About Obc Reservation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pankaja Munde
go to top