Jitendra Awhad : ''जातीवादाचा वास येतो असं मी कुठेही म्हटलेलं नाही'', बाबासाहेबांवरील वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा यू टर्न

न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.
Jitendra Awhad
Jitendra Awhad esakal

नागपूरः न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर आव्हाडांनी यू टर्न घेतल्याचं दिसून येतंय.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

''मला वाईट वाटतं.. न्यायव्यवस्थेत आरक्षण ठेवायला पाहिजे होतं.. मी बोलत नाही कारण वाद निर्माण होतो. काही काही जजमेंट अशी येतात त्यातून जातीचा वास यायला लागतो. न्याय व्यवस्था ही नॉन बायस असली पाहिजे.. अशी संविधानाची अपेक्षा आहे.''

''बाबासाहेबांना मिठी मारायची असेल तर प्रत्येक मानवाने मारली पाहिजे. संविधानाने सर्वांना समान संधी दिली आहे. मात्र न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन ८० टक्के समाजावर बाबासाहेबांनी अन्याय केला.'' असं वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं.

Jitendra Awhad
राम मंदिराचे कुलूप कोणामुळे उघडले? जस्टीस पांडे, राजीव गांधी की काळे माकड...? अयोध्येचा रंजक अध्याय

आव्हाडांची सारवासारव

''न्याय व्यवस्थेच्या निकालातून जातीय वास येतो असे बोललो नाही'' असा घुमजाव जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ''मी असा म्हटलेले नाही, भाषण काढून बघा.. वैचारिक लढाई ही लढाई नसते.. लोकांना विचार मांडणे आवडत नाही कारण एखादा विचार मांडला की, शिव्या देत सगळे रस्त्यावर येतात..''

आव्हाड पुढे म्हणाले, मी तो काल विषय मांडला आणि तिथेच मी तो विषय संपवलेला आहे. मी माझी शंका होती ती व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी का केलं.. का केलं नाही... हे मी सांगू शकत नाही. माझे विचार होते. ते मी मांडत असतो. समाजाला पटले तर ठीक नाही पटले तरी ठीक. माझ्या विचारांना मान्यता द्या, अशी मी कोणावर जबरदस्ती करत नाही.

''मला अनुभव आला.. मी शांत बसणारा माणूस नाही. माझ्या आईला कधीही पूजेला बोलावत नव्हते. ती माझ्या मनातील वेदना आहे. मी ती बोललो तिने कधीच आम्हाला हे सांगितलं नाही. मी वाचत गेलो आणि वर्णद्वेष समजत गेलो. चातुरवर्ण समजत गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या आईला का बोलावलं जात नाही.''

Jitendra Awhad
Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवच्या नवीन सिनेमाची घोषणा! 'लग्न कल्लोळ' सिनेमाची घोषणा, ही अभिनेत्री झळकणार

जितेंद्र आव्हाड शेवटी म्हणाले, मी घडलेला प्रसंग लपवणारा माणूस नाही. आपला अपमान मनात कशाला ठेवायचा? तो मी बोलून दाखवला.. कुठल्या निर्णयाला धरून बोललेलो नाही. काहीतरी शोधकार्य पत्रकार म्हणून तुम्ही केलं तर बरं होईल. सगळे प्रश्न विचारून त्याच्याकडूनच उत्तर घ्यायची याला पत्रकारिता म्हणत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com