महाराष्ट्राची ही संस्कृती नाही; आव्हाड,पंकजा मुंडेंनी नोंदवला निषेध

महाराष्ट्रात लोकशाहीची क्रूर हत्या होत आहे-जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्राची ही संस्कृती नाही; आव्हाड,पंकजा मुंडेंनी नोंदवला निषेध

मुंबई: काल कोर्टाचा निकाल लागल्यानंतर कोर्टाच्या बाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers Agitation) न्यायव्यवस्थेचा जय जयकार केला. अचानक आज शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या घरावर मोर्चा घेऊन जाणे हे गणित कळत नाही. पवार साहेबांचे ते व्यक्तिगत निवासस्थाने आहे सरकारी नाही. ही महाराष्ट्राची (Maharashtra) संस्कृती नाही. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. बाटल्या मारणे, चपला मारणे हा प्रकार योग्य नाही या घटनेचा निषेध राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नोंदवला आहे.

ते पुढे म्हणाले, मतभेद असू शकतात. मतभेदाचा सन्मान करणे ही लोकशाही आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची क्रूर हत्या होत आहे अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. ज्यापद्धतीने राजकीय वळण दिले जात आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारं नाही असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राची ही संस्कृती नाही; आव्हाड,पंकजा मुंडेंनी नोंदवला निषेध
'शरद पवार,संजय राऊतांचा 3 वेळा महाविकास आघाडी बनवण्याचा प्रयत्न'

महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधीच घडले नाही. गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास तपासून पाहिला तर अस लक्षात येईल की, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाच-पाच संघटना होत्या. पण त्या संघटना शरद पवारांना मानणाऱ्या होत्या. एसटी कामगारांना कायम एक वेगळे प्रशासन देऊन पुढे नेण्यात आले आहे. हे भाजपचे कटकारस्थान असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

महाराष्ट्राची ही संस्कृती नाही; आव्हाड,पंकजा मुंडेंनी नोंदवला निषेध
Hasan Mushrif l कोल्हापुरात जयश्री जाधवच विजयी होणार; हसन मुश्रीफ

राज्याच्या माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारच्या घटना घडणे हे दुर्दैवी आहे. कर्मचाऱ्यांचा हा विषय संबंधित मंत्र्यांनी हाताळणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या. मात्र या घटनेची माहिती मिळाल्याशिवाय मी बोलू शकणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com