'आधी रजिस्टर, नंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न का?'

कोरोनाच्या काळात एका बड्या नेत्यानं आपल्या मुलीचं लग्न साधेपणानं लावून दिलं याचं कौतुक झालं.
Dr Jitendra Awhad
Dr Jitendra Awhadsakal media
Summary

कोरोनाच्या काळात एका बड्या नेत्यानं आपल्या मुलीचं लग्न साधेपणानं लावून दिलं याचं कौतुक झालं.

७ डिसेंबर रोजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुलीचं लग्न अगदी साधेपणानं लावलं. आपल्या घरी रजिस्टर विवाह (Register Marriage) करुन देत त्यांनी मुलीला सासरी पाठवलं. कोरोनाच्या (Covid-19) काळात एका बड्या नेत्यानं आपल्या मुलीचं लग्न कोणताही थाटमाट न करता साधेपणानं लावून दिलं याचं कौतुक झालं. मात्र दुसरीकडे आव्हाड यांच्या मुलीचं गोव्यात अगदी धुमधडाक्यात लग्न साजरं झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Social Media) झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचा आता गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने विवाह! यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. याला आव्हाड यांनी ट्वीट करुन उत्तर दिलं आहे.

Dr Jitendra Awhad
नवाब मलिकांच्या घरी 'सरकारी पाहुणे' येणार? स्वत: दिली माहिती

ते म्हणातात, 'काही विकृतांच्या माहितीसाठी अॅलन हा ख्रिश्चन आहे म्हणून त्याला ख्रिश्चन पद्धतीने लग्न करावं लागलं. त्याच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी गोवा हे ठिकाण निवडलं. अॅलन आणि नताशा हे दोन भिन्न व्यक्तिमत्व आहेत आणि ते एकमेकांच्या आवडी-निवडीचा आदर करतात', असं त्यांनी ट्वीटद्वारे स्पष्टीकरण देत विरोधकांना कानपिचक्या दिल्या आहेत. मुलगी नताशाचा वर ख्रिचन असल्याने त्याच्या इच्छेनुसार आजचे लग्न झाले आहे. हा त्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा निर्णय होता. माझ्या मुलीने तिच्या आवडीच्या पद्धतीने लग्न केले आहे. आम्ही दोघांचाही निर्णय स्विकारला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Dr Jitendra Awhad
MPSC: उत्तरतालिकेतून थेट प्रश्न वगळले; न्यायालयात याचिका दाखल

दरम्यान, नताशा ही जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. एलेन पटेल यांच्याशी तिचा 7 डिसेंबर रोजी विवाह पार पडला. एलेन आणि नताशा इयत्ता पहिलीपासून एकत्र शिकले आहेत. शाळेतला जोडीदारच तिचा लाईफ पार्टनर झाला आहे. नताशाचं शिक्षण एमएस इन मँनेजमेंटमध्ये झालं आहे. तर एलेनचं शिक्षण एमएस अँड फायनान्स मँनेजमेंटमध्ये (MBA) झाले आहे. एलेन स्पेनमधल्या (Spane) एला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला आहे. मुलीच्या इच्छेनुसार आव्हाड यांनी हे लग्न साधेपणानं केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com