Explained : जितेंद्र आव्हाडांवर लागलेल्या कलम ३५४ मध्ये विनयभंगाची व्याख्या काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad
Explained : जितेंद्र आव्हाडांवर लागलेल्या कलम ३५४ मध्ये विनयभंगाची व्याख्या काय?

Explained : जितेंद्र आव्हाडांवर लागलेल्या कलम ३५४ मध्ये विनयभंगाची व्याख्या काय?

ठाण्यातल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांची अटक आणि जामिनावर सुटका झाली. त्यानंतर काही वेळातच आव्हाडांवर कलम ३५४ अंतर्गत गुन्हाही दाखल झाला. मात्र हा गुन्हा खोटा असल्याचं सांगत त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. काय आहे हे कलम ३५४?

हेही वाचा: Jitendra Awhad : विनयभंग झाला का? आव्हाडांचा 'तो' व्हिडीओ आला समोर

हर हर महादेव हा चित्रपट सुरू असताना ठाण्यातल्या विवियाना मॉलमधल्या चित्रपटगृहात जाऊन आव्हाडांनी काही शो बंद पाडले, तसंच प्रेक्षकांना मारहाण केल्याचाही आरोप जितेंद्र आव्हाडांवर होता. त्यानंतर आव्हाड यांना अटक करण्यात आली आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. काल कळव्यात एका पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप एका महिलेने केला आहे. त्याप्रकरणी आपल्यावर कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे.मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

हेही वाचा: Jitendra Awhad: आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल

काय आहे कलम ३५४?

भारतीय दंड संहितेतलं कलम ३५४ विनयभंग आणि लैंगिक छळाशी संबंधित आहे. यामध्ये साधारण एक ते तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. एखाद्या व्यक्तीशी शारिरीक जवळीक साधण्याचा प्रयत्न, लैंगिक संबंधाची मागणी किंवा महिलेच्या इच्छेविरुद्ध पॉर्नोग्राफिक कन्टेन्ट तिला दाखवणे अशा गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. यासाठी त्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षाही सुनावली जाते. किंवा दंडात्मक कारवाईची तरतूदही करण्यात येते.

हेही वाचा - मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

महिलेसोबत जितेंद्र आव्हाडांनी काय केलं?

या महिलेने आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार दिली आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कळव्यातल्या एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे गाडीतून परत जात असताना त्यांच्या गाडीच्या बाजूला गर्दी झाली होती. शिंदेंना भेटण्यासाठी ही महिला जात असताना समोरुन येणाऱ्या आव्हाडांनी तिच्या दोन्ही खांद्याला दाबून 'काय उभी आहेस, बाजूला हो', म्हणत ढकललं, असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीनंतरच आव्हाडांच्या विरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.