Jitendra Awhad : विनयभंग झाला का? आव्हाडांचा 'तो' व्हिडीओ आला समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad
Jitendra Awhad : विनयभंग झाला का? आव्हाडांचा 'तो' व्हिडीओ आला समोर

Jitendra Awhad : विनयभंग झाला का? आव्हाडांचा 'तो' व्हिडीओ आला समोर

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेचा आता व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad: आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कळव्यातल्या एका पुलाच्या उद्घाटनाला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाडही होते. त्यावेळी मुख्यमंत्री बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीबाहेर गर्दी झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावेळी जितेंद्र आव्हाड गर्दीतून वाट काढत होते. काही लोकांना बाजूला सारत होते. त्यावेळी ही महिलाही समोर आली. तिच्या खांद्याला हात लावून आव्हाडांनी या महिलेला बाजूला सारलं.

हेही वाचा: Jitendra Awhad: 'मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय'; आव्हाडांच्या ट्वीटमुळे खळबळ

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही येत आहे. शिवसेनेच्या विदर्भातल्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. जबरदस्ती तुमचा रस्ता कोणी रोखणारं बाजूला व्हा सांगून ऐकत नसेल तर तुमच्यावरच गुन्हा दाखल होणार का?, असंही त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.