
शरद पवार आणि मातोश्रीबद्दल वाकडं बोला आणि... - जितेंद्र आव्हाड
राज्याचं राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे. राणा दाम्पत्याचा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याचा हट्ट, संतप्त शिवसैनिकांचं आव्हान, भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेला हल्ला या सगळ्या घडामोडींमुळे टीकाटिपण्णांना चांगलंच उधाण आलंय. या सगळ्यातच आता चर्चा होतेय जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटची.
आपल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात, "शरद पवार साहेब आणि मातोश्री बद्दल थोडेसे वेडेवाकडे बोला सगळीकडे headline मिळवा. चर्चेत या. राजकारणाची घसरती पातळी चिंताजनक आहे. आजचे भाव - पेट्रोल - १२५ रुपये, डिझेल ९७ रुपये, गॅस १०५० रुपये." या ट्विटमध्ये आव्हाडांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं आहे.
कालच मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मुंबईत दाखल झाले आहेत. तेव्हापासून त्यांच्या घराबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. काल रात्रीच शिवसैनिकांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांच्यावर मातोश्रीची रेकी केल्याचा आरोपही केला आहे. आज सकाळी शिवसैनिकांनी बॅरिकेड्स ओलांडून राणा राहत असलेल्या इमारतीमध्ये प्रवेश केला. हा सगळा गोंधळ अजूनही सुरूच आहे.
Web Title: Jitendra Awhad Sharad Pawar Politics In Maharashtra Tweet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..