अजित पवार हे भावनाप्रधान, कुटुंबवत्सल : आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

अजित पवार यांच्या मनात अनेक दिवसांपासून होते, की माझ्यामुळे अनेकांना त्रास होत आहे. महाराष्ट्रात असे भावनाप्रधान राजकारणी फार कमी आहेत. अत्यंत कुटुंब वत्सल असणार व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित पवार आहेत. भविष्यातील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे, दर तीन महिन्यांनी त्यांची बदनामी सुरू आहे.

मुंबई : अजित पवार हे अतिशय भावनाप्रधान  व कुटुंबवत्सल असे व्यक्तिमत्व आहे. त्यांना संपविण्याचे आणि बदनामीचे काम सुरु आहे. प्रचंड मनुष्यप्रेमी ते आहेत. त्यांचा कालचा राजीनामा हा तडकाफडकी नव्हता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

अजित पवारांसोबत फक्त सुनिल तटकरे; शिष्टाईचे जोरदार प्रयत्न 

अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अजित पवार राजीनामा दिल्यापासून कोणाच्या संपर्कात नाहीत. शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या राजीनाम्याविषयी भाष्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस लागली कामाला; शरद पवारांच्या आज मुंबईत बैठका

आव्हाड म्हणाले, की अजित पवार यांच्या मनात अनेक दिवसांपासून होते, की माझ्यामुळे अनेकांना त्रास होत आहे. महाराष्ट्रात असे भावनाप्रधान राजकारणी फार कमी आहेत. अत्यंत कुटुंबवत्सल असणार व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित पवार आहेत. भविष्यातील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे, दर तीन महिन्यांनी त्यांची बदनामी सुरू आहे. अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लावू नका. अत्यंत भावनाप्रधान असे अजित पवार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad statement about Ajit Pawar resignation