
Summary
तुळजापूर दौर्यावर असताना जितेंद्र आव्हाड आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मंदिराबाहेर वाद व तणाव निर्माण झाला.
आव्हाड यांनी मंदिर विकासाला विरोध नसून ऐतिहासिक वास्तू व गाभारा संरक्षित राहावा अशी भूमिका मांडली.
भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्यावर चुकीची माहिती पसरवून मंदिराची बदनामी केल्याचा आरोप केला, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
Tuljabhavani Devi Temple Renovation Dispute : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे तुळजापूर दौऱ्यावर असताना आव्हाड समर्थक आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली आणि परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांना मंदिराबाहेरच अडवले. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही असे आव्हाड यांची भूमिका मांडली. यावर भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड हे दिशाभूल करत असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.